नेहरू युवा केंद्रातर्फे रालातो महाविद्यालयात पडोस युवा संसद

 





 अकोला  दि.२१(जिमाका)- येथील नेहरू युवा केंद्र व श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने 'पडोस युवा संसदे'चे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षस्थानी ॲड. मोतीसिंहजी मोहता होते. डॉ.संजय खडककार यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या प्रसंगी पवनजी माहेश्वरी, प्राचार्य डॉक्टर विजय ननोटी,  जिला युवा अधिकारी महेश सिंह शेखावत,समन्वयक डॉ.सुधीर कोहचाळे, विशाल राखोंडे, उपस्थित होते.

ॲड मोतिसिंह मोहता म्हणाले की, युवकांची भूमिका तसेच राष्ट्र निर्माणात युवकांच्या नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा आहे.  सुत्र संचलन डॉ. प्रवीण कावळे तर महेश सिंह शेखावत यांनी आभार मानले.

डॉ. संजय खडककर यांनी 'जी २० व युवक', डॉ.सुधीर कोहचाळे यांनी 'लाईफ', शैलेंद्र मडावी यांनी 'इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट', या विषयांवर मार्गदर्शन केले. 'वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी विशेष सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. विजय नानोटी, महेश सिंह शेखावत, शैलेंद्र मडावी, शंकेश झायटे, प्रदीप राऊत, गणेश पोटे, मयूर लहाने, राजेश डांगटे, अमोल भटकर, हरी ओम राखोंडे, राधा खंडारे, शुभम भालेराव, नम्रता आठवले, शिवा राऊत यांनी तसेच विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ, पाथर्डी साने गुरुजी मंडळ, पातुर, आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ अकोली जहागीर, यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रीमती पंचफुला देवी समाजकार्य महाविद्यालय, खडकी यांच्या पथकाने पथनाट्य सादरीकरण केले.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ