कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘तीन’ पॉझिटिव्ह


अकोला दि.9(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 58 अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील कोरोना संसर्ग तपासणी अहवालात दि. 25 फेब्रुवारी ते 8 मार्च  कालावधीत कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नोव्हता. तथापि आज(दि.9) आरटीपीसीआर चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व एका महिलाचा समावेश असून हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘तीन’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66085(49952+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आज संसर्ग तपासणी अहवालात प्राप्त झालेला तीन सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ