जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कारवाई; धामणा व वाघजाळी येथे रोखला बालविवाह


            अकोला दि.29(जिमाका)- अकोला तालुक्यातील धामणा व  वाघजाळी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील  अल्पवयीन बालीकेचा बालविवाह रोखण्याची कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या केली, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बालसंरक्षण कक्षाला माहिती मिळाली की, धामणा ता.अकोला येथे बुधवार दि.22 मार्च रोजी व बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी वरखेड येथे सोमवार दि. 27 मार्च रोजी अल्पवयीन मुलीचा बालविवाह  होऊ घातला आहे,अशी माहिती बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार बालिका 18 वर्षांपेक्षा कमी वयाची खात्री करुन तिच्या नातेवाईकांना बालविवाह अधिनियम 2006 अंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीचा विवाह ती 18 वर्षांची पूर्ण होईस्तोवर करणार नाही असे लेखी हमी पत्र पालकांकडून घेण्यात आले व विवाह रोखण्यात आला.

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, धामणा गावाचे सरपंच संजय भांबेरे, वाघजाळीचे सरपंच अरुणा शंकर सोळके, ग्रामसेवक सुषमा नामदेव लव्हाळे, बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पीएसआय निलेश तारक यांनी कार्यवाही केली.

बालविवाह अधिनियमानुसार मुलीचे वय 18 वर्ष व मुलांचे वय 21 वर्ष असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वय असल्यास तो बालविवाह मानून कायद्याने गुन्हा ठरतो. यासाठी दोन वर्ष सक्षम कारावास व एक लाख रुपयेपर्यंत दंड होवू शकतो. अशा विवाह आढळल्यास त्याची माहिती टोल फ्रि क्रमांक 10985 या क्रमांकावर किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ