कोविड; दोघे पॉझिटीव्ह

 अकोला दि.११(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३७ अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. २ व खाजगी ०)२+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह२.

आरटीपीसीआर ‘दोन’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हे दोघे पुरुष रुग्ण असून अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘सहा’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६०८८(४९९५५+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ