कोविडः ‘पाच’ पॉझिटीव्ह
अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 47 जणांचे अहवाल प्राप्त
झाले. त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 5.
आरटीपीसीआर
‘पाच’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात पाच जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात एक पुरुष व चार महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर
येथील दोन, अकोला ग्रामीण येथील एक व उर्वरित दोन रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील
रहिवाशी आहे, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
सक्रिय
रुग्ण ‘18’
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66119(49986+15142+991) आहे. दोन रुग्णास डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात
18 सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील पाच रुग्णालयात दाखल असून उर्वरीत
13 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा