जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन; 1 ते 8 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन


अकोला, दि. 1 (जिमाका)- राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाव्दारे जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कर्णबधिरता सप्ताह साजरा केला जाणार आहे. हा सप्ताह दि. 1 ते 8 मार्च या कालावधीत राबविले जाणार असून जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

            जागतिक कर्णबधीरता दिन दरवर्षी दि. 3 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी सन 2023 करिता घोषवाक्य 'सर्वांसाठी कान आणि ऐकण्याची काळजी! चला ते प्रत्यक्षात आणूया’ (Ear and hearing care for all! Let's make it a reality) जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने सप्ताहामध्ये विविध उपक्रमाव्दारे जनजागृती केली जाणार आहे. याकरिता जिल्हास्तरावर नोडल अधिकारी यांना सप्ताह अंमलबजावणीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ