खादी व ग्रामोद्योग मंडळाव्दारे शुक्रवारी(दि.10) रोजगार मेळावा


 अकोला,दि.9(जिमाका)- पंतप्रधान रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रोकडे मंगल कार्यालय, महसुल कॉलनी, अकोला येथे शुक्रवार दि. 10 मार्च रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत होणार आहे. या मेळाव्यात युवक युवतीना रोजगाराच्या संधी तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पंतप्रधान रोजगार व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत सेवाउद्योग, प्रक्रिया व निर्मिती उद्योगाला 15 ते 35 टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो. तरी नवीन उद्योग करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नंदा लवाळे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ