एक दिवशीय कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन; रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी





अकोला,दि.31(जिमाका)- विधी संघर्ष ग्रस्त बालकांना रोजगारांच्या संधी निर्माण व्हावे याकरिता एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध विषयावर विधी संघर्ष ग्रस्त बालकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेतच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध झाली असून रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केले.

            बाल न्याय मंडळ व एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहाश्रय, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन समुपदेशन केंद्र येथे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन शिबीर पार पडले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीस सुवर्णा केवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा न्यायाधीस शयना पाटील, सुनील पाटील, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक द.ल.ठाकरे, बालहक्क आयोगाचे ॲड. संजय सेंगर, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष शुभांगी यादव, बाल न्याय मंडळ व बालकल्याण समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.

            मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाले की, शासनाव्दारे कर्ज योजना, सवलती दिल्या जातात त्याचा उपयोग विधी संघर्ष ग्रस्तांनी घ्यावा. तसेच उद्योग निर्मिती व रोजगारसंदर्भातील येणाऱ्या अडचणीचा या कार्यशाळेत निराकरण करुन घ्यावे. तसेच उद्योग व रोजगार निर्मितीकरिता प्रशासनाचे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वस्त जिल्हाधिकारी यांनी केले.

            कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन केले. त्यानंतर गायनाव्दारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन कार्यशाळेच्या  पहिला सत्रात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक नयन सिन्हा, एमसीईडीचे प्रकल्प प्रमुख प्रसन्न रत्नपारखी, दिलीप सरदार यांनी उद्योग निर्मिती, प्रशिक्षण कार्यक्रम, शासनाच्या कर्ज योजना इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तर दुसरा सत्रात लोकसेवा करिअर ॲकडमीचे गजानन वाकोडे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारिका घीरणीकर व वैशाली गावंडे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ