कोविडः ‘सहा’ पॉझिटीव्ह

 

   अकोला दि.30(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 46 जणांचे  अहवाल प्राप्त झाले. त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 6 व खाजगी 0)6+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 6.

आरटीपीसीआर ‘सहा’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन प्रमाणे रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘23’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66130(49997+15142+991) आहे. तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 23 सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील सहा रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 17 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ