पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार वितरण


अकोला दि.27(जिमाका)- महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. त्याअनुषंगाने सन 2013-14 ते 2018-19 या वर्षाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात मंगळवार दि. 28 मार्च रोजी दुपारी 3 वाजता शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर पुरस्कार याप्रमाणे : सन 2013-14 चा पुरस्कार डॉ. निर्मला पुंडलीकराव भामोदे, सन 2014-15 चा खुशबु महादेव चोपडे, सन 2015-16 चा ॲड. मनिषा नरेंद्र धुत व सन 2018-19 चा नेहा चक्रधर राऊत यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. पुरस्कार विजेतांना मानचिन्ह, शाल, श्रीफळ व 10 हजार रुपयेचा धनादेश दिल्या जाईल.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ