जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध उपक्रम;






अकोला  दि.24(जिमाका)-  आरोग्य विभागाव्दारे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सेंट अन्स हायस्कुल, मूर्तिजापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, कान्हेरी सरप येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय प्रभात फेरी, निक्षय मित्र जोडणी अभियान व गरजु क्षयरुग्णांना धान्य वाटप करण्यात आले.  

निशय पोषण योजनेअंतर्गत डॉ. विक्रम शर्मा यांनी निश्रय मित्र बनुन मुर्तिजापूर येथील 11 क्षय रुग्णांना सहा महिन्यापर्यंत दत्तक घेवून फुड बास्केटचे वितरण केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ विलास सोनोने, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ मनीष शर्मा, डॉ विनोद चव्हाण, सर्व शालेय व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कान्हेरी सरप येथील नागरिकांना क्षयरोगबाबत मार्गदर्शन करुन उपचाराबाबत माहिती दिली. त्यांनतर निक्षय पोषण योजनेतंर्गत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य तथा जनआरोगय समितीचे अध्यक्ष श्री. भटकर यांनी निक्षय मित्र बनुन पाच गरजु क्षयरुग्णांना, दिनेश लोहोकार यांनी पाच रुग्णांना तर डॉ. सचिन राठोड यांनी एक रुग्णाना, असे 11 रुग्णांना दत्तक घेऊन सहा महिन्यापर्यंत फुड  बास्केट वाटप केले. फुड बॉस्केटमध्ये गहु, तेल, तुरदाळ, गुळ, मटकी, पारले बिस्कीट व वाटणे इत्यादी वस्तूचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.गमे, डॉ. राठोड, शिराज खानसर आरोग्य सेविका यांनी परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ