कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित


अकोला, दि. 1 (जिमाका)- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत कृषि निविष्ठा विक्रेतांकरिता कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रती बॅच 40 प्रमाणे 80 कृषि निविष्ठा विक्रेतांची निवड करावयाची आहे. याकरीता इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी बुधवार दि. 15 मार्चपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे प्रकल्प संचालक यांनी केले.

अटि व शर्ती याप्रमाणे :

1.      इच्छुक कृषि निविष्ठा विक्रेता हा परवानाधारक व अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असावा.

2.      कृषि निविष्ठा विक्रेतांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावा.

3.      विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन निविष्ठा विक्रेतांची संपूर्ण माहिती, रासायनिक खते विक्री परवाना प्रत, वैधता व गुमास्ता इ.सांक्षाकित प्रती व तीन पासपोर्ट फोटो कार्यालयीन वेळेत प्रकल्प संचालक आत्मा मुर्तिजापूर रोड अकोला येथे प्रत्यक्ष सादर करावा.

4.    अर्जाचा नमुना मार्गदर्शक सुचना वेबसाईटवर तसेच प्रत्यक्ष प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय येथे उपलब्ध आहेत.

5.     प्रवेश प्रक्रिया ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य या तत्वावर आधारित राहिल.

6.     प्रशिक्षणार्थीस निवड झाल्यानंतर विहित वेळेत प्रवेश फी रक्कम 10 हजार रुपयेचा डी.डी.सादर करणे बंधनकारक राहिल.

7.     उपलब्ध प्रवेश क्षमतेपेक्षा(80) जास्त आवेदन पत्र प्राप्त झाल्यास त्यापैकी प्रथम 80 प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. उर्वरित प्रशिक्षणार्थींची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन त्यांना पुढील बॅचमध्ये प्रवेश देण्यात येईल. पदविका अभ्यासक्रम हा बियाणे, खते व रासायनिक औषधे यांच्या नुतनीकरणासाठी आवश्यक राहिल.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ