पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बुधवारी(दि.8) होणार 208 पदांसाठी भरती प्रक्रिया



अकोला,दि.2(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात  बुधवार दि. 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात 208 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी  या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

मेळाव्यात सहभागी उद्योजक याप्रमाणे : 1)  सनसाईन इंजिनिअरिंग अकोला येथे अकॉऊटंट व मार्केटींग एक्झिक्युटीव्ह पदासाठी 14 पदे, 2) ट्रेड कार्ट डिजीटल प्रा.लि. अकोला येथे कॉम्पुटर ऑपरेटर पदासाठी 4 पदे, 3) धुत ट्रान्समिशन फलोरा औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 50 पदे, 4) कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.लि. चाकण पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 50 पदे, 5) निपूण मल्टीसर्व्हीसेस औरंगाबाद व पूणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 90 पदे या प्रमाणे 208 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 व भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ