कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटिव्ह
अकोला दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून
कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 44 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.
1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
त्यात एका महिलाचा समावेश असून हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी
आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून
प्राप्त झाली.
सक्रिय रुग्ण ‘चार’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66086(49953+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात चार
सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा