भटके श्वान दत्तक घेण्यासाठी प्राणी कल्याण मंडळाचे मार्गदर्शक सूचना


अकोला, दि.1(जिमाका)- भटक्या श्वानांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना दत्तक घेण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या पत्रानुसार मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.  त्यानुसार श्वान प्रेमी नागरिकांनी प्राणी कल्याण मंडळ किंवा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या प्राणी शेल्टरमधून श्वानांना दत्तक घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले.

स्वान दत्तक घेण्यासाठी अटी व शर्ती :  पाळीव प्राणी दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. श्वानांची काळजी व देखभाल करणारा असावा. श्वानांना पुरेसा पोषक आहार, वैद्यकीय काळजी आणि निवारा असणे आवश्यक राहिल. श्वान  दत्तक घेतांनी प्राणी कल्याण मंडळ किंवा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती घरी भेटी दरम्यान हाऊस चेक फॉर्म  दिल्या जाईल. फोटो आयडी, रहिवाशी पत्ता इ. कागदपत्रे जमा करणे आवश्यक राहिल. अटीशर्ती पूर्ण केल्यानंतर पूर्ण दत्तक फॉर्म भरुन देण्यात येईल. राज्य प्राणी कल्याण मंडळ किंवा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या आश्रयस्थानामधून श्वान दत्तक घेऊन दत्तक प्रमाणपत्र घ्यावे.

दत्तक श्वान ठेवण्यासाठी सूचना : अनेक मजल्यांच्या अपार्टमेंट्स किंवा घरांमध्ये पाळीव प्राणी पळून जाण्याचा किंवा पडण्याचा धोका टाळण्यासाठी बाल्कनी आणि खिडक्या जाळी लावावे. तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू झाकून ठेवावी. घरातील इलेक्ट्रीक फिटिंग झाकलेली असावी. विषारी झाडे, द्रव्य, रसायने, विषारी अन्न  पाळीव प्राण्यापासून दूर ठेवावे. घरातील योग्य ठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी आरामदायक बेडिंग ठेवण्यात यावे. प्राण्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे. पाळीव प्राणी प्रजाती नुसार त्यांना योग्य भोजन पुरविले जाईल याची काळजी घ्यावी. श्वानांना दिवसातून किमान दोनदा फिरायला न्यावे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ