मिशन बिगेन अंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी ; शहरासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता सुधारित आदेश जारी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला , दि. 31 (जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचने नुसार ‘ मिशन बिगेन ’ अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा , दुकाने , भाजीपाला , फळे यार्ड , पेट्रोल पंप , सलून , बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश 31 ऑगस्टपर्यंत कायम राहतील. ऑगस्ट महिण्याच्या प्रत्येक रविवार कडक संचारबंदी लॉकडाऊन लागू राहिल. या पुर्वीच्या आदेशानुसार निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवून सुधारीत आदेश संपूर्ण अकोला शहर व जिल्हातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहतील. 1. सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्ठाने , दुकाने व ज्यांना यापूर्वी सुर...