"प्लेसमेंट ड्राईव्ह" पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


अकोला, दि.14 : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने २० ऑगस्ट रोजी "प्लेसमेंट ड्राईव्ह" पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ४ नामांकित खाजगी कंपन्यांमार्फत एकूण १०० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. या मेळाव्याकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रीया https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या माध्यमातून करावा व दि. २० ऑगस्ट रोजी मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यास ऑनलाईन सहभाग नोंदविण्यासाठी पुढील प्रक्रीया करावी. 1. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळा भेट द्या. २. Employment या टॅबवर क्लिक करा. ३. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन साईन इन करा. ४. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. ५. District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्दनास येईल त्यासमोर असलेल्या Action बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल. ६. तद्नतंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनवर क्लिक करा. । Agree हा पर्याय निवडा. ७. शेवटी Successfully Applied for the Job असा मॅसेज दिसेल अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवू शकता. दि. २० ऑगस्ट रोजी जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपले बायोडाटा, शैक्षणीक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यासंबंधीत अधिक माहिती करिता या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४ - २४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा