नूतन जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांनी स्वीकारला पदभार
अकोला, दि २०: अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली. श्रीमती मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच विविध विभागप्रमुखांची ओळख करुन घेतली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत, जिल्हा नियोजनभवन, उपाहारगृह, अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केली
यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, जोगेंद्र कट्यारे उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार सुरेश कव्हळे आदी उपस्थित होते.
०००
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा