जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

 






अकोला,दि. २८(जिमाका) –क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच सर्व योग संघटना, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.  रामदास पेठ येथील सांस्कृतिक भवन क्रीडा संकूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्मल सी.के. बडोला, डॉ. सतीश उंटागळे, डॉ. क्रीष्ण मुरारी शर्मा, संजय देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, श्रीमती एम.जी. ठाकरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, प्रशिक्षणार्थी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिता तिवारी यांनी केले.  निशांत वानखडे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे, अनिल डेंगाळे, अशोक वाठोरे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ