अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक; मतदार ओळखपत्रांसोबतच पर्यायी कागदपत्रे पुरावा ग्राह्य



            अकोला, दि.24(जिमाका)-  अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे. या निवडणूकीत मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्रांसोबतच पर्यायी कागदपत्रे पुरावा ग्राह्य धरुन मतदानाचा हक्क बजावता येईल. तरी पदवीधर निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी सहभागी होवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी केले.

            पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूककरिता मतदान करताना मतदारांचे ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे पुरावा सादर करावा.

पर्यायी पुरावा याप्रमाणे : आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र.  केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदार व आमदारांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाव्दारे वितरीत मुळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इ. पर्यायी पुरावे ग्राह्य धरणात येईल.

 मतदार ओळखपत्रात मतदारांची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येईल. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावर विसंगत छायाचित्रामुळे मतदारांची ओळख पटविणे शक्य नसल्यास मतदारास पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख  कागदपत्र सादर करणे आवश्यक राहिल. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि. 11 जानेवारी 2023 चा आदेश अंतिम राहिल, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ