जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मार्गदर्शन कार्यशाळा


अकोला दि. 4(जिमाका)- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाअंतर्गत ‘सखी’ वन स्टॉप सेंटरच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवार दि. 2 रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कामकाज करताना महिलांवर होणारे अत्याचार व सायबर गुन्हा या विषयावर मागदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे आयोजन महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे व वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. बाल व कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अनिता गुरव यांनी  स्वत:चा बचाव स्वत:च्या तल्लख बुध्दीने करु शकतो, असे अतिशय मोलाचे मार्गदर्शन दिले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक बाल कल्याण सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी सायबर गुन्हे हाताळणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. अकोला बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. भारती रुंगटा यांनी महिला कर्मचाऱ्यांचा कामाच्या ठिकाणी होणारा छळ, अत्याचारा विरुद्ध कायद्याची मदत कशा पद्धतीने घेता येईल, याची माहिती दिली. व्यवस्थापन समिती सदस्य निशा ग्यारल,  बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनिल लाडूलकर व समुपदेशक सचिव घाटे यांनी मार्गर्शन केले.  कार्यशाळामध्ये परिचारीका प्रशिक्षण केंद्रातील नर्सिंग स्कुलच्या व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महिला अत्याचारावर पथनाट्य सादर केले

          कार्यक्रमाचे संचालन वैद्यकीय सहाय्यक कर्माचारी प्रिया इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना अक्षय चतरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन ताले यांनी केले. यावेळी  जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सर्व महिला कर्मचारी व नर्सींग स्कुलच्या विद्यार्थींनी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ