अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक आढावा; आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा-विभागीय आयुक्त

 





 अकोला, दि.2 (जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आढावा बैठकीत दिले

जिल्हाधिकारी यांच्या दालनात अमरावती विभाग पदविधर मतदारसंघ निवडणुक संदर्भात आढावा घेण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे, सहा.पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदि उपस्थित होते.

            पदविधर निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र, वाहन व्यवस्था, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उपलब्धतेबाबत पूर्व तयारी ठेवावी. मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदारांची संख्या वाढवावी.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आवश्यक ते उपाययोजना राबवावी. घोषित निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहितेप्रमाणेच  करावयाची असुन त्यात काटेकोर दक्षता पाळावयाची आहे, अस‍े निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले.    

निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत असून मतदार नोंदणी अंतिम टप्यात चालू असल्याचे माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ