रस्ता सुरक्षा अभियान 2023: रस्ते सुरक्षेची सवय ही स्वयंप्रेरणेने व्हावी- पोलीस अधिक्षक संदिप घुगे








अकोला, दि. 11(जिमाका)-    रस्ता सुरक्षा नियम हे सप्ताहापुरती बाळगावयाची बाब नसून ते स्वयंप्रेरणेने आयुष्यभरासाठी अंगीकाराला हवी.  तसेच आपल्या निष्काळजीपणाने अपघातास निमित्त होणार नाही, याची दक्षता घेणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी आज येथे केले.

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्यातर्फे वाहन चाचणी मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मोटार वाहन निरीक्षक हेंमत खराबे, तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व शिकाऊ अनुज्ञप्तीधारक, वाहन चालक, व मोठया संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक संदिप घुगे म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ते संदर्भातील कायदे व नियमाचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे.  अशाप्रकारे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा ही स्वयंप्रेरणेने पाळावयाची बाब आहे,असे त्यांनी सांगितले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अपघाताची संख्या कमी झाली असून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी राबविल्यामुळे शासनाव्दारे उल्लेखनिय बाब म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचा सत्कार करण्यात येणार आहे, हे अभिमानाची बाब आहे. तसेच आपण दैनंदिन जीवनात वाहन चालवितांना  अनेक प्रकारे निष्काळजीपणा करुन स्वतःचा व अन्य व्यक्तिंचा जीव धोक्यात घालत असतो, हे अत्यंत धोकेदायक असून अपघातातील अकस्मात मृत्यूंमुळे कुटुंब व समाजावरही परिणाम होतो, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहन निरिक्षक हेमंत खराबे यांनी केले. रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजनामागील भुमिका व जिल्ह्यातील अपघात स्थितीबाबत माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शेळके यांनी तर आभार प्रदर्शन लेनिन ढाले गावंडे यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ