अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक; सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा





 अकोला, दि.4 (जिमाका)-  अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या संहितेप्रमाणेच  करावयाची असुन  सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आढावा बैठकीत दिले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पदविधर मतदारसंघ निवडणुक संदर्भात सर्व विभाग प्रमुखासोबत आढावा घेण्यात आला.  यावेळी प्र.अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अभयसिंह मोहिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

            आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याकरिता आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे याची दक्षता घ्यावी.  सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे बॅनर पोस्टर काढण्याची कार्यवाही संबधित विभागाने करावी. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक पथके तयार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

उपजिल्हा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आचार संहितेच्या कालावधीत काय करावे व काय करु नये, याबाबत सविस्तर माहिती विभाग प्रमुखांना दिल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने घोषीत केलेला कार्यक्रमाची माहिती देवून निवडणूक आयोगाचे सूचना व निर्देशाबाबत माहिती दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ