अमरावती विभाग पदविधर निवडणूकीची अधिसूचना जाहिर


 अकोला, दि.5(जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार निवडणूकीची अधिसूचना आज जाहिर करण्यात आली आहे. ते याप्रमाणे:

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीकरिता नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या प्रस्तावकाला निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे गुरुवार दि. 12 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येईल. नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती यांचे कार्यालयात करण्यात येईल. सोमवार दि. 16 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांला अर्ज मागे घेता येईल. विधानपरिषदेची पदवीधर निवडणूकीकरिता मतदान सोमवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ