निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार यांनी केली पातूर येथे मतदान केंद्राची पाहणी


 अकोला,दि. 15 (जिमाका)-अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूकीतकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार यांनी आज १५ जानेवारी रोजी पातूर येथील आरीफनगरातील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत मतदार केंद्र असलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी वाशिम उपजिल्हा निवडणूक अधिकारी  संदीप महाजन, पातूर तहसीलदार दीपक बाजड व नायब तहसीलदार विजय खेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

           मतदान केंद्रात प्रकाश व्यवस्था पुरेशी असावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता गृह उपलब्ध असावे. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था असावी. मतदान केंद्राबाबत कोणत्याही मतदाराची तक्रार येणार याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश निवडणूक निरिक्षक यांनी दिले.

0000000





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ