फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

 


अकोला, दि.१९(जिमाका)- जिल्ह्यासाठी माहे फेब्रुवारी महिन्यासाठी  लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.

वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

१.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती,  मोफत

२.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, मोफत

३.      अंत्योदय अन्न योजना गहू-१५ किलो प्रति कार्ड, मोफत

४.    अंत्योदय अन्न योजना तांदूळ-१५ किलो प्रति कार्ड, मोफत

५.     नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांना लहानमोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार एक किलो 

      प्रति शिधापत्रिका, २०रुपये प्रतिकिलो.

    हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ