17 वे राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन मिरज-सांगली येथे; 31 जानेवारीपर्यंत कामगार साहित्यीकांनी अर्ज करावा


अकोला दि. 13(जिमाका)-  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार साहित्यीकांच्या कलागुणांना वाव मिळावा] याकरीता दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी मिरज-सांगली येथे ‘17 वे राज्यस्तरीय कामगार साहित्य संम्मेलन चे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मंगळवार दि. 31 जानेवारीपर्यंत सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळचे प्रभारी सहायक कल्याण आयुक्त  वैशाली नघवरे व कल्याण निरिक्षक बी.टी.भेले यांनी केले आहे.

कामगार साहित्य संम्मेलनामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत कामगार साहित्यीकांची उपस्थिती लाभणार असून साहित्यीक विचारांची मेजवानी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरीता कामगार साहित्यीकांनी आपला सहभाग नोंदवीसाठी जवळच्या केंद्रात किंवा ललितकला भवन भिमनगर डाबकी रोड अकोला येथे विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज सादर करावा. संम्मेलन स्थळावर खानपान व निवासांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवसासाठी खानपान व निवास व्यवस्थाकरीता पाचशे रुपये तर खानपान व्यवस्थेकरीता दोनशे रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. तरी साहित्य संमेलनात प्रवेश निश्चित करण्यासाठी नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी मो.क्र. 9822704179 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 0724-2420282 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ