शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा


            अकोला, दि.5(जिमाका)- जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय  खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या  आस्‍थापनांनी त्‍याच्‍या आस्‍थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची डिसेंबर 2022 अखेरचे त्रैमासिक विवरण नमुना ईआर-1 ची सांख्यिकी माहिती मंगळवार दि. 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करा, असे आवाहन  जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.

  सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्‍थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्‍तपदे सक्‍तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्‍या कलम5(1) नुसार प्रत्‍येक तिमाहीस विहीत नमुना ईआर-1 मध्‍ये नियमीतपणे कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्‍दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्‍या अनुषंगाने डिसेंबर 2022 अखेर संपणाऱ्या तिमाही नमुना ईआर-1 (ER-1) मधील त्रैमासिक सांख्यिकिय माहीती नोदणीकृत सर्व आस्‍थापनांनी यापुर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करुन  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर त्रैमासिक विवरण पत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्‍दतीने सादर करावे.

तसेच प्रत्‍येक आस्‍थापनेने आपला नोंदणी तपशील, आवश्‍यक  सर्व माहीती नोंदवून अद्यावत करावा. त्रैमासिक ईआर-1 किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करतांना कोणत्‍याही प्रकारची अडचण आल्‍यास  akolarojgar@gmail.com या ई-मेल आयडी किंवा जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या दुरध्‍वनी क्रमांक 0724-2433849 अथवा 9665775778  या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*