प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई;पाच हजार दंड वसूल




अकोला, दि. 9(जिमाका)- प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने आज शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यात व्ही.एच.बी. कॉलनी गौरक्षण रोड, अकोला येथे  धाडी दरम्यान 35 किलो प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करुन मांजा विक्रेताकडून पाच हजार रुपये दंड वसूल करुन कारवाई करण्यात आली.

ही कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदुषण नियंत्रण मंडळ व अनंतनंदाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या पथकाव्दारे राबविण्यात आली. यामध्ये पोलिस विभागाचे संजय पारस्कर, बाबुराव देशमुख तसेच अमोल सोनोने, परेश धुमाळे, श्याम क्षिरसागर, कोमल कुतरमारे यांचे सहकार्य लाभले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ