अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश

 अकोला,दि. २८(जिमाका) –अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि. ३० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुका निर्भय, शांततेत व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्याप्रमाणे : ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे, त्‍या मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात सर्व पक्षांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्‍या कामा‍व्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ