मुर्तिजापुर येथील उपजिल्हा रूग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

अकोला,दि. 17 (जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 जानेवारी रोजी उपजिल्हा रूग्णालय, मुर्तिजापुर येथे महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे आयोजन  करण्यात आले. यावेळी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाव्दारे मानसिक आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे उद्घाटन उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमनकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास सोनोने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधिर कराळे, मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल चांडक, डॉ. राम बिहाडे, डॉ. फैजल अन्सारी, डॉ. सुधीर मनवर, डॉ. वर्षा नंमाडे, डॉ. रामु नागे आदि उपस्थित होते.

तणाव मुक्त जिवन जगण्याकरीता निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, गीत गायन, छंद जोपासणे, आनंदी राहणे, इतरासोबत मनमोकळेपणाने बोलणे इत्यादी बाबीमुळे तणावमुक्त राहण्यास मदत होते. तसेच तणाव मुक्त कसे राहावे याबाबत डॉ.तरंगतुषार वारे यांनी मार्गदर्शन केले.  

 जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत स्मृतिभ्रंश डिप्रेशन, व्यसनमुक्ती व इतर मानसिक आजाराबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात आली. तसेच  टेलीमानस 14416 या टोल फ्री नंबर ची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य कार्यक्रम, सर्कस आहार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग्य निर्मुलन कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे स्ट्रॉल लावून जनजागृती करण्यात आले. यावेळी संत साईबाबा नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानसिक आजार, ताणतणाव व व्यसनाधीनता याबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले.

शिबीरामध्ये 720 रूग्णांची तपासणी

शिबीर कार्यक्रमात एकुण 720 रूग्णांची तपासणी करण्यात आले. यामध्ये मानसिक आरोग्य विभागाचे 76, अससंर्गजन्य आजार विभागाचे 86, दंतरोग 105, स्त्रीरोग 26, बालरोग 52, मेडिसिन विभागातील 32,  नेत्र रूग्ण 62, अस्थिरोग 40, भौतिकोपचार 16 व इतर 83 रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच शिबीरांमध्ये आलेल्या रूग्णांना समुपदेशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास सोनोने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव तर आभार प्रदर्शन अजयसिंग चव्हाण यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप इंगोले, सोपान अंभोरे, सय्यद आरीफ, प्रतिभा तिवाणे, रिना चोंडकर, कविता रिठ्ठे, विशाल झांबरे, विजय भगत परिश्रम केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ