कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह,तीन डिस्चार्ज
अकोला दि. 5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून
कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 69 अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही. तर तिन जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण
पॉझिटीव्ह 0.
आरटीपीसीआर ‘निरंक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
तिन जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात तिन
रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘एक’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक
सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा