ग्रा.पं.निवडणूक लढलेल्या उमेदवारांनी 19 जानेवारीपर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा



 अकोला दि. 13(जिमाका)-  जिल्हयात 266 ग्रामपंचायतीकरीता सदस्य पदासह थेट सरपंच पदाकरीता प्रत्यक्ष सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम घेण्यात आला. निवडणुक लढविलेल्या उमेदवारांनी विहित मुदतीच्या आत म्हणजेच 19 जानेवारी 2023 पुर्वी निवडणुक खर्चाचा हिशोब विहित नमुन्यात संबंधित तहसिल कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. याची सर्व उमेदवार व थेट सरपंच यांनी नोंद घ्यावी. तरी उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर करा, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

0000000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना