मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कथा, कविता, गोष्टी,गाण्यांमधून व्हावेत मराठीचे संस्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे प्रतिपादन














अकोला,दि. ३०(जिमाका)- शालेय जीवनात मराठी शिक्षणाचा अंतर्भाव असतो. मात्र विद्यार्थ्यांना कथा, कविता, गोष्टी, गाणी, गप्पा या माध्यमातून मराठी भाषेचे संस्कार व्हावेत, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपानिमित्त आज येथील कोठारी कॉन्व्हेंट स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, संस्थेचे पदाधिकारी नारायण भाला, अनिल राठी, मराठी भाषा समिती सदस्य सुरेश पाचकवडे, श्याम ठक, समन्वयक किशोर बळी आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीमती अंजली कडलासकर या होत्या.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत; महत्त्वाच्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. गीत गायन, अभिवाचन, अभिनय, नाट्यछटा, सादरीकरण या माध्यमातून मराठी भाषा विषयक विविध उपक्रम सादर केले.  विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. उपजिल्हाधिकारी शेलार, किशोर बळी, सुरेश पाचकवडे, श्याम ठक यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तत्पूर्वी शाळेत मांडण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षीय समारोप अंजल कडलासकर यांनी केला. सुत्रसंचालन संजिवनी देशमुख तर आभारप्रदर्शन प्राजक्ता गर्गे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ