अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक; फिरते पथकांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून विशेष अधिकारी

 



            अकोला, दि.24(जिमाका)-  अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील उपविभाग निहाय स्थायी निगरानी पथक, फिरते पथकांच्या प्रमुखांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या पथकांच्या प्रमुखांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे 129, 133,143 व 144 कलमानुसार शनिवार दि. 28 जानेवारीचे सायंकाळी 6 वाजेपासून ते सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकारी प्रदान केले आहे. या अधिकारानुसार नियुक्त केलेल्या त्यांचे क्षेत्रात आवश्यकता भासल्यास या अधिकारांचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ