जिल्हा उद्योग केंद्राचा उपक्रम; शुक्रवारी(दि.6) उद्योग सुलभता कार्यशाळा

अकोला दि. 4(जिमाका)-  उद्योग विभाग, मैत्री विभाग व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकुल वातावरणास चालना मिळण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही कार्यशाळा आयसीएआय भवन, तोष्णीवाल लेआउट, अकोला येथे शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटता, नामांकित उद्योजक, सनदी लेखापाल, सनदी वास्तु रचनाकार इंजिनिअर्स तसेच व्यवसायाशी संबंधित सर्व शासकीय विभाग यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंन्द्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

 

           

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा