गुरुवारी(दि.12) स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण


 अकोला दि. 11(जिमाका)- ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ निमित्त शाळा व विद्यालय स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांना आज (दि.12) दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे बक्षीस वितरीत होणार आहे. त्याअनुषंगाने व्याख्यानकर्ते, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र माइनॉरिटी एनजीओ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्त शाळा व विद्यालय स्तरावर अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणिव करुन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता भिंत्ती पत्र व निबंध स्पर्धा तर अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे. याकरीता जिल्ह्यातील जेष्ठ विधी तज्ञ, व्याख्यानकर्ते, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अल्पसंख्याक असोसिएशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ