जिल्हा न्यायालयव्दारे 20 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन




 अकोला दि. 10(जिमाका)- महाराष्ट्र राज्य विध‍ि सेवा, मुंबई व जिल्हा व सत्र न्यायधिस यांच्या निर्देशानुसार दि. 20 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील विविध कोचिंग क्लासेसमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बालकांवर होणारे लैंगीक अत्याचार, पॉक्सो कायदा, सायबर क्राइम, मानवी तस्करी, कायदा व सुव्यवस्था व नैतिकता इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या अभियानातर्गंत आज सरस्वती कोचींग क्लासेस, जवाहर नगर, अकोला येथून शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा न्यायाधिश डी. बी. पतंगे, अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यो. सु . पैठणकर, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर यांनी सायबर क्राईम, सोशल मिडीयाचा उपयोग, बालकांविषयी कायदे तसेच नैतिकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  अभियान यशस्वी करण्यासाठी कोचिंग क्लासेस संघटनेचे विधीज्ञ  गोपाळ गावंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे डी. पी. बाळे, अधिक्षक संजय रामटेके, राजेश कृ. देशमुख, हरीश इंगळे, शिपाई, शाहीबाज खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ