जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक



            अकोला, दि.6(जिमाका)-  जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र 2023-24 करीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून आधार क्रमांक मोबाईला लिंक असणे आवश्यक आहे. याकरीता विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन प्रवेशाकरीता आधार क्रमांक लिंक करुन घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.

            पालकांनी शाळेच्या मुख्याधापकांच्या सही शिक्यानिशी माहिती भरलेले फार्म आधार कार्ड  व पासपोर्ट फोटो घेवून ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा. अर्ज अपलोड करताना मोबाईलवरील ओटीपीव्दारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याकरीता आधार क्रमांक मोबाईल लिंक करणे आवश्यक राहिल. प्रवेश अर्ज प्रक्रियेकरीता http://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज करण्यासाठी अंतिम दि. 31 जानेवारी असून त्यापूर्वी आधार क्रमांक मोबाईला लिंक करुन घ्यावे. तांत्रिक व इतर कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यार्थी व पालकांनी घ्यावी राहू नये याकरीता मुदतीपुर्वीचे नोंदणी करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगांव जहॉ.,अकोला येथे किंवा 0724-2991087 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

           प्रवेशाकरीता पात्रता : जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकलेला असावा, विद्यार्थी-विद्यार्थीनी इयत्ता तिसरी व चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा, तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीचे पुर्ण शैक्षणिक सत्र अकोला जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत झालेला असावे,  विद्यार्थ्यांचा जन्म दि. 1 मे 2011 ते दि. 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत झालेला असावा.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ