मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आकाशवाणी केंद्रावरुन विशेष मुलाखतीचे आज(दि.25) प्रसारण

            अकोला, दि.24(जिमाका)-  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा केला जात आहे. यानिमित्त अकोला आकाशवाणी केंद्रावरुन  बुधवार दि.25 रोजी सकाळी 10 वा. विशेष मुलाखतीचे प्रसारण केले जाणार आहे. या मुलाखतीत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे व राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य डॉ. रावसाहेब काळे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बातचीत केली आहे. या मुलाखतीसाठी आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख विजय दळवी यांनी सहकार्य केले आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रसारण नागरिकांनी ऐकावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना