मकरसंक्राती-भोगी हा सण ‘पौष्‍टीक तृणधान्‍य दिवस’ म्‍हणुन साजरा करा; कृषी विभागाचे आवाहन


       अकोला दि. 13(जिमाका)- संयुक्‍त राष्‍ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष’ म्‍हणुन घोषित केले आहे. त्‍याअनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने विविध खात्‍याच्‍या समन्‍वयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन हे तृणधान्य वर्ष साजरा करण्‍याचे ठरविले आहे. या उपक्रमाअंतर्गत तृणधान्‍य पिकाच्या लागवड क्षेत्रात व उत्‍पादकतेत वाढ करणे, आहारामध्‍ये पौष्‍टीक तृणधान्‍य उदा. ज्‍वारी, बाजरी, नाचणी, राळा व राजगीरा या सारख्‍या तृणधान्‍याचे आहारातील महत्‍व व त्‍याचे फायदे याबाबत जनजागृती करण्‍याकरीता कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे.

          राज्य शासनाने ६ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मकर संक्राती - भोगी हा सण पौष्‍टीक तृणधान्य दिवस म्‍हणुन साजरा करण्‍याबाबत निर्देश दिले आहे. या दिनाचे औचित्‍य साधुन प्रत्‍येक गावामध्‍ये कृषि सहाय्यकामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्‍यावर आधारीत चर्चा सत्र, तृणधान्‍याच्‍या विविध जाती, लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्‍या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्‍य पिकापासुन बनविण्‍यात येणारे विविध उपपदार्थ इत्‍यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमात प्रगतशिल शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापिठाचे शास्‍त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी मार्गदर्शन करणार आहे.

          तरी जास्तीत जास्‍त शेतकरी, महीला  विद्यार्थ्यांनी संबधित गावाच्‍या कार्यक्रमात सहभागी होऊन दैनंदिन आहारातील पौष्‍टीक तृणधान्‍याच्या महत्‍वाबाबतची माहिती घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ