‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान दि.३० पासून

 


 अकोला दि.१९(जिमाका)-  केंद्रीय कुष्ठरोग विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी सोमवार दि.३०जानेवारी ते दि.१३ फेब्रुवारी या पंधरवाड्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाद्वारे आरोग्य शिक्षणाचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासंदर्भात आज जिल्हा समन्वय समितीची सभा पार पडली.

लोकशाही सभागृहात पार पडलेल्या या सभेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. एस. डी. बाबर, साथरोग अधिकारी डॉ.जावेद खान, वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना बोंडे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.

या अभियानात प्रजासत्ताक दिनी (दि.२६) ध्वजारोहणानंतर  जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी  भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,  ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालय, नगरपालिका दवाखाने, महापालिकेचे दवाखाने, सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालये,  शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाडी या सर्व ठिकाणी कुष्ठरोग जनजागृतीबाबत प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.  तसेच सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करुन कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती  देण्यात येईल, अशी माहिती डॉ. बाबर यांनी दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ