‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’; जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन:तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा






अकोला दि.4(जिमाका)-  संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषीत केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता शेतकरी व नागरिकांमध्ये जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’साजरे करण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी डॉ.कांतप्पा खोत, प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’साजरे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारणीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीसह 24 विभागाचे सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत महिनानिहाय वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात शास्त्रज्ञाव्दारे व्याख्याने, रॅली, महिला बचत गटांचे शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला, भाषण इ. स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ