कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’,एक डिस्चार्ज


अकोला दि. 6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 45 अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून आता जिल्हयात एकही रुग्ण नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0 +रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0.

आरटीपीसीआर ‘निरंक’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66096(49963+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण नाही, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा