राष्ट्रीय मतदार दिवस; लोकशाही बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी आवश्यक







अकोला,दि.२५(जिमाका)- मतदान नोंदणी न केलेल्या मतदारांनी तसेच नवमतदारांनी आपल्या कर्तव्याप्रती जागृत राहून मतदान नोंदणी करुन मतदार यादीत नाव समावेश झाल्याची खातरजमा करावी. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी आवश्यक असून याबाबत मतदारांनी नेहमी जागरुक असावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाडवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार अविनाा शिकटे, नायब तहसिलदार अतुल सोनोने,  सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नवमतदार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या संदेशाचे चित्रीकरणाव्दारे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाविद्यालय व मनपा उर्दू शाळाचे विद्यार्थ्यांव्दारे मतदार जनजागृतीपर नाटीका व निवडणूक प्रक्रिया संदर्भात सादरीकरण केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शाळा व महाविद्यालयस्तरावर रांगोळी, चित्रकला, वकृत्व व निबंध अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेतांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

दरम्यान सर्वांनी मतदान करण्याबाबतची सामुहिक  प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले. 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ