प्रधानमंत्री पिकविमा योजनाःतक्रार निवारणासाठी दर शुक्रवारी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा

 


अकोला, दि.१९(जिमाका)- प्रधानमंत्री पिकविमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी  दर शुक्रवारी  सकाळी ११ वा.प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे, या सभांना शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिकविमा योजना सन २०२२-२३ मध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनी मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पिकविमा योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी, पिकविमा प्रतिनिधी तसेच तालुकास्तरीय समिती मधील इतर सदस्य यांचे उपस्थितीत दर शुक्रवारी सभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले होते. तरी पिकविम्याबाबत तक्रार असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित सभेस उपस्थित राहावे, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळव‍िले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ