अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार केंद्र शोधण्यासाठी लिंकचा वापर करावा- डॉ. दिलीप पांढरपट्टे



अकोला, दि.24(जिमाका)-  अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये आपले नाव व बूथ क्रमांक शोधण्यासाठी कृपया मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या   https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/   लिंकचा वापर करावा,असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मतदारांना केले आहे. या लिंकवर क्लिक करून आपले नाव , आडनाव  व जिल्ह्याचे नाव यासह सर्च केल्यास आपले नाव ज्या मतदान केंद्रास  जोडले आहे त्या मतदान केंद्राचे नाव व मतदान केंद्र क्रमांक आपणास समजतो.

 अमरावती पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांनी कृपया या लिंकचा वापर करून अमरावती पदवीधर मतदारसंघात  आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर ( Polling Booth)  आहे याची माहिती करून घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

०००००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना