औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

 


            अकोला, दि.7(जिमाका)- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी तंत्रप्रदर्शनी-२०२२ मध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना विविध व्यवसायात पुरस्कार प्राप्त केले. पुरस्कार प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना  सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण करण्यात आले.

सत्कार कार्यक्रमात प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून नवीन पिढीतील शिकणाऱ्या मुलींनी सावित्रीबाईंचा वसा घेऊन पुढे जावे. मुलींनी सक्षम होणे गरजेचे असून पुढील आवाहनांबाबत त्यांना जाणीव करून दिली. महिलांच्या उन्नती करिता तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता अधिक सक्षमतेने पुढे येणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य ठोकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

अभियांत्रिकी व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक प्रथम वर्षाला शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थींना जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक प्राप्त केले त्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचे शिल्पनिदेशक व प्रथम पारितोषिक प्राप्त तंत्रकृतीचे  मार्गदर्शक  अरविंद पोहरकर तसेच या तंत्रकृती मध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीनी सायली पेढेकर, रुचिका तायडे,  किरण निलखन, निकिता नवलकार यांना प्रमाणपत्र तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बिगर अभियांत्रिकी व्यवसाय मध्ये जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व्यवसायाच्या शिल्पनिदेशिका निवेदिता माणिकराव आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थीनी 

अपूर्वा वाकोडे, रिद्धी खापरे, गायत्री मोरे, दुर्गा अल्हाट यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. 

कार्यक्रमाची प्रास्ताविक तसेच  आभार प्रदर्शन संस्थेचे ज्येष्ठ शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी गोपनारायण यांनी केले. यावेळी ज्येष्ठ निदेशिका किशोरी फुके, गटनिदेशिका आर. आर. रोडगे, तसेच संस्थेतील सर्व निदेशक आणि कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ