प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई; 50 किलोचे साहित्य जप्त:पाच हजार दंड वसूल



अकोला, दि. 11(जिमाका)- प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी धडक मोहिमे राबवून मांजा विक्रेतांवर कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत आज दुसरी मोठी कारवाई भगतवाडी, अकोला येथे धाड टाकून 50 किलो प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करुन पाच हजार रुपये दंड वसूल करुन कारवाई करण्यात आली.

ही कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदुषण नियंत्रण मंडळ व अनंतनंदाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या पथकाव्दारे राबविण्यात आली. यामध्ये पोलिस विभागाचे संजय पारस्कर, बाबुराव देशमुख तसेच अमोल सोनोने, परेश धुमाळे, श्याम क्षिरसागर, राज मोरवाल, कल्पेश देशमुख व डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांचे सहकार्य लाभले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ